Breaking News

कार आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार


राहता तालुक्यातील पिंपळस शिवारात नगर-मनमाड महामार्गावर एका हॉटेलजवळील कालव्याच्या पुलावर आज {दि. २९ } पहाटे कार आणि दुचाकी वाहनाचा अपघात झाला, या अपघातात प्रदीप त्रिंबक डोखे (वय ३७) हा ठार झाला.

साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात सुपरवाईझरपदावर तो कार्यरत होता. चालकाचा कारवरील {क्र. एओ-३,एई-८७४६} ताबा सुटल्याने सदर कार दुचाकीवर {क्र. एम. एच- १७ ए एल ६८८५} आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डोखे यास उपचारार्थ राहाता ग्रामीण रुग्णालायात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. त्याचा भाऊ प्रविण त्रिंबक डोखे {रा. पुणतांबा} याने फिर्याद दिली.