Breaking News

बोटा येथील श्रीराम पतसंस्थेत चोरीचा डाव फसला!


तालुक्यातील बोटा येथे अज्ञात चोरटयांनी येथील श्रीराम पतसंस्थेत केलेला चोरीचा डाव फसला आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रोखपाल राजाराम देवराम कुरकुटे यांनी फिर्याद दिली. बुधवारी पहाटे साडेतीन चारच्या सुमारास येथील गावकऱ्यांना पतसंस्थेचा अलार्म वाजत असल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी ताबडतोब ही माहिती पतसंस्थेचे व्यवस्थापक, रोखपाल व चेअरमन यांना दूरध्वनीवरून कळवली. यावेळी सर्व गावकरी व संस्थेचे कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयाजवळ आले असता त्यांना पतसंस्थेच्या खिडकीचे ग्रील उचकलेले दिसले. परंतु आत सर्वकाही तपासले असता कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल गेला नसल्याची खात्री झाली. चोरट्याने आत प्रवेश केल्यानंतर अलार्म वाजल्याने त्याने पळ काढला असावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे होते.