नेप्तीत रामायण कथेची उत्साहात सांगता
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्रीराम मंदिरात राम नवमी निमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय रामायण कथेची सांगता डॉ.जालिंदर महाराज निकम (निंबळक) यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात झाली.
श्रीराम नवमी सोहळ्या निमित्त संगीत रामायण कथेचे प्रारंभ दि.19 मार्च रोजी झाले होते. दि.24 मार्च पर्यंन्त चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात रामायणाचार्य डॉ.जालिंदर महाराज निकम यांनी आपल्या मधुर वाणीद्वारे भाविकांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्या निमित्त दररोज भजन, हरिपाठ व ज्ञानेश्वरी पारायण आदि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे हे तीसवे वर्ष असून, या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतला.