भारुळे कुटुंबीयांनी केलेले अवयवदानाचे कार्य समाजासमोर रोल मॉडेल -खा.सदाशिव लोखंडे
मनुष्य कितीही उच्च पदावर गेला तरी मुलांचे लग्न जमविण्यासाठी समाजात जावे लागते. यासाठी प्रत्येकाची समाजाबरोबर नाळ जुडलेली असली पाहिजे. भारुळे कुटुंबीयांनी केलेले अवयवदानाचे कार्य समाजासमोर रोल मॉडेल आहे. रविदास महाराजांनी देखील अंधश्रध्देवर घाव घालत गरजू व वंचित घटकासाठी मदत करण्याचा संदेश दिला असून, त्यांची प्रेरणा घेवून समाजात मरणानंतर अवयवदानाबद्दल जागृती होण्याची गरज असल्याची भावना खा.सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली.
चर्मकार विकास संघाच्या पुढाकाराने तर वधु-वर परिचय व सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित निशुल्क राज्यस्तरीय चर्मकार वधु-वर परिचय मेळाव्या प्रसंगी खा.लोखंडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळच्या जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, प्रमोद सावकारे, संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव सुभाष चिंधे, तुळशीराम घनदाट, संतोष कांबळे, पांडुरंग काजळकर, समितीचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, उपाध्यक्ष अरुण गाडेकर, श्रीपती ठोसर, महिला अध्यक्षा रुख्मिणीताई नन्नवरे, संभाजी साळे, रामदास सातपुते, विलास जतकर, नानासाहेब शिंदे, लताताई पोटे, देवराम पोटे, देवराम तुपे, संजय साळवे, भाऊसाहेब आंबेडकर, भारत चिंधे, अरविंद कांबळे, मिनाक्षी साळवे, वसंत देशमुख, भास्कर सोनवणे, इजि. तुकाराम गायकवाड, मिनाताई नन्नवरे, कॉ.नानासाहेब कदम, अर्जुन कांबळे आदि उपस्थित होते.