Breaking News

जैन ओसवाल धर्मशाळेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार


नगर- संस्थापक अध्यक्ष काळात केलेले कार्य व सर्वांची मिळालेली साथ यामुळे पतसंस्थेने केलेल्या प्रगतीत सिंहाचा वाटा असल्याची जाणीव सर्वांनाच आहे,अनेक युवकांना यातून रोजगार उपलब्ध झाला याचे समाधानही आहे,छोटेसे लावलेले रोपटे आज बहारदार वृक्ष झाल्याचे पाहताना अत्यंत आनंद होत आसून जैन ओसवाल सहकारी पतसंस्थेतर्फे होणारा सत्कार व सन्मान मोलाचा असल्याचे मत माजी संस्थापक चेअरमन श्री.सुभाष मुथा यांनी व्यक्त केले. 

जैन ओसवाल धर्मशाळेत माजी संस्थापक चेअरमन श्री.सुभाष मुथा यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक शांतीलाल गुगळे यांच्या हस्ते,माजी व्हा.चेअरमन राजेंद्र गांधी यांची सरचिटणीस पदी निवड झाल्या बद्दल तज्ञ संचालक सीए.विशालजी गांधी यांच्या हस्ते,श्री.संपत बाफना यांची खजिनदारपदी निवड झाल्या बद्दल संचालक किरण शिंगी यांच्या हस्ते व माजी संचालक विलास गांधी यांची चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल संचालक समिरजी बोरा यांच्या हस्ते सहकार महर्षी श्री.सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल सहकारी पतसंस्थेतर्फे चेअरमन मनोज गुंदेचा व व्हा. चेअरमन ईश्वरजी बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी मुथा बोलत होते.यावेळी संचालक सौ.सुवर्णा डागा, संतोष गांधी ,शैलेश गांधी,सचिन सोनी, विनोद चंगेडीया ,विजय गुगळे,व्यवस्थापक प्रशांत भंडारी ,कर्मचारी व सभासद उपस्थित होते.