Breaking News

उपसभापती सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते सभामंडप भूमिपुजन

तालुक्यातील मुसलमान वाडी ( सांगवी ) येथे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निधीमधून सभामंडप मंजूर झाला व त्या सभामंडपाचे भूमिपूजन पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रत्नापुर / मुसलमानवाडीचे जनतेतील भाजपाचे सरपंच दादा वारे, उपसरपंच शहाजी महारनवर, पाटोदा वि. वि. से. सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, गोरख घनवट, भाजपा नेते शाहूराव जायभाय, डॅा. गणेश जगताप, डॉ. मकरंद राऊत, संतोष कात्रजकर, राम टिळेकर, गोरख राजगुरू, मुबारक भाई, मलिक भाई, अन्सार भाई यांच्यासह या वेळी मुसलमान वाडी येथे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.