तालुक्यातील कुसडगाव येथील पै. पप्पू कात्रजकर यांची शिवसंग्राम संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. जामखेड तालुक्यात पप्पु कात्रजकर हे कायम समाजकार्यात अग्रेसर असतात. तालुक्यामध्ये तरूण युवा कार्यकर्त्यांचे मोठया प्रमाणात संघटन उभे केले आहे. तसेच कुस्ती क्षेत्रात त्यांनी आपल्या कारकीर्दीत गाजवले आहे. त्याचबरोबर ते अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी असतात. गोरगरीब शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्न करतात. या सर्व केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेऊन शिवस्मारक समिती मुंबईचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे व शिवसंग्रामचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांनी शिवसंग्राम भवन बीड येथे पप्पू कात्रजकर यांना पक्ष प्रवेश देऊन यांची जामखेड तालुकाध्यक्ष पदाची घोषणा करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
शिवसंग्राम तालुका अध्यक्ष पदी पप्पू कात्रजकर यांची निवड
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:17
Rating: 5