Breaking News

मेघराज बजाज यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेस मोफत टेबल खुर्च्यांचे वितरण

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील चिंचेचे लवन, गुंड-वारे वस्ती तसेच बोरीचे लवन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना फर्निचरचे मोफत वितरण करण्यात आले. राशिनच्या वासुदेव फर्निचरच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला.

वासुदेव फर्निचरचे मालक मेघराज बजाज यांच्या वतीने तीनही शाळांना प्रत्येकी 2 टेबल, एक कपाट व पाच खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. मेघराज बजाज व कविता बजाज दांपत्याच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.कुळधरण ग्रामविकास संघटनेचे महादेव सुपेकर, सुधीर जगताप, प्रा. किरण जगताप, बंटीराजे जगताप, बंडू सुपेकर, अक्षय सुपेकर, महिला आघाडी व शालेय व्यवस्थापनच्या अध्यक्षा वर्षाराणी सुपेकर, निर्मला सुपेकर तसेच हभप जगन्नाथ महाराज वाळेकर, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष भगवान जगताप, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप सुपेकर, संपत खराडे, गणेश खराडे, दादा अंबादास काळे, दादा संभाजी काळे, शिवाजी दानवले, बापुराव कदम यांच्यासह शिक्षक अशोक घालमे, दादा बिटके, नितिन घालमे, संतोष अनभुले, भाऊसाहेब रसाळ, गंगा पांडुळे, स्मिता गडगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.