प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आले, त्यांनी ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. चंद्रकांतदादा माझ्या अंगावर धावून आले. त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले. अक्षरश: अंगावर धावून आले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे, असेही कपिल पाटील म्हणाले. विधीमंडळात घडलेल्या या घटनेचे स्वत: सभापती आणि सर्व आमदार साक्षीदार आहेत. त्यामुळे इतके गंभीर वर्तन करणार्या चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरिक्षण करावे आणि दिलगिरी व्यक्त करावी असेही कपिल पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडून धमकी कपिल पाटील यांचा गंभीर आरोप
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:17
Rating: 5