विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षांकडून विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती व नियमबाह्य वर्तनाने या सभागृहाचा विश्वास गमविला असल्याने त्यांना अध्यक्ष पदावरुन दूर करण्यात यावे असा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडला असल्याची माहिती विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी दिली. यावेळी बोलताना विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, सभागृहामध्ये एका तथाकथित ऑडिओ क्लीपबाबत मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले. त्या ऑडिओ क्लीपबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आम्ही त्यासाठी तयार आहोत असे सांगितले. मात्र तरीही त्यांचे सदस्य गोंधळ घालताना दिसत होते आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांना बोलू दिले नाही. यांना लोकशाही टिकवायची आहे की नाही, असा सवाल अजित पवार यांनी केला.
सत्ताधारी सदस्यांचा गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री काहीच बोलले नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कामकाज होवू नये असेच वाटत होते हे स्पष्ट होते. यावर अध्यक्षांनी कोणतीच भूमिका घेतली नाही आणि दिवसभरासाठी कामकाज तहकुब करुन टाकले. दरम्यान, विधानपरिषदेमध्ये शिवसेनेने मांडलेल्या परिचारकांचा ठरावावर सभागृह नेते मर्यादा सोडून वागले. सभागृह चालू नये असा गोंधळ सुरु व्हावा अशी भूमिका सरकारने घेतली आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.