मुंबई : आयएनएक्स मीडिया प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी यांची सीबीआयने समोरासमोर बसवून चौकशी केली. या चौकशी दरम्यान इंद्राणी मुखर्जी हिने कार्ती आणि माझी दिल्लीतल्या हयात हॉटेलमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी आमच्यात आर्थिक व्यवहारासंबंधी चर्चा झाली असल्याचे सीबीआयला सांगितले. मात्र, अशा प्रकारे आपली कुठलीही बैठक इंद्राणी मुखर्जी सोबत झाली नसून माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे कार्तीने म्हटले आहे.
आयएनएक्सकडून कार्ती चिदंबरमला मिळाली होती लाच
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:54
Rating: 5