Breaking News

दुःख दूर करण्यासाठी राम रसायन उपाय - आचार्य शंकरजी स्वामी


नेवासा तालुक्यातील भेंडा येथे चालू असलेल्या राम कथेतील पाचवे पुष्प गुफताना महाराजांनी आपल्या मधुर वाणीतून सागीतले. आपल्या जीवनाचे कल्याण करण्यासाठी संतांना मार्ग विचारावे. जीवनात जे मिळाले त्यात सुख मानावे, जीवनात आई वडीलांना विसरु नये, परमार्थाचे सुख सर्वांना कळत नाही. ज्यांना कळते त्यांच्यावर कृपा झालेली असते. भगवंताचे नाम असे आहे की, कितीही ऐकले तरी कंटाळा येत नाही. रामकथा जो श्रवण करतो त्यांचे निश्‍चित कल्याण होते. जीवन जगत असताना काही लोक गूण कमी पाहतात पण दोष जास्त पाहतात. दोष बघणाराचे कधीच कल्याण होत नाही. कथेतून काही तरी घेतले पाहिजे. प्रवचनातून चागला विचार घेतला पाहिजे. आपल्या जीवनाचे कल्याण कशात आहे. त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. भक्ती प्राप्त करणे खूप कठीण, टीकविने अधीक कठीन असते, जो धर्माने चालत नाही, तसेच विनाकारण जो क्रोध करतो, तो सोचनीय आहे. अशा मनुष्याने आपल्या जीवनात निती सोडली, त्यांची गती होत नाही. मनुष्याचे आचरण हे खूप म्हत्वाचे आहे. आपल्यात किती ज्ञान आहे, कसा जगतो, कीती धन आपल्याकडे आहे या गोष्टीस महत्व नाही, तर मनुष्यच्या आचरणास खूप महत्व आहे. माणसांच्या आचरणाला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व आपल्या चरित्राला आहे. भव्य व्यथा नष्ट करण्यासाठी रामयाण कथा आहे. परमार्थापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. पाचवे पुष्प ऐकण्यासाठी परिसरातील भाविक भक्तानी मोठी गर्दी केली होती. काल सायंकाळी रामकथेची सांगता झाली. तर आज सकाळी पहाटे पाच ते आठ यावेळेत श्रींचा सुर्योदय पंचामृत महाभिषेक व जन्मोत्सव सोहळा ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आनिल पंडीत शेवाळे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर दैनिक लोकमंथनने चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिल्याबद्दल संकलन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.