Breaking News

वृद्ध महिलेचे प्रेत आढळल्याने खळबळ


जामखेड तालुक्यातील दरडवाडी खर्डा भागात एका वृद्ध महिलेचे प्रेत आढळून आले असल्याने खळबळ उडाली आहे. खर्डा भागात लांडीतलाव परिसरातील मोकळ्या रानामध्ये नंदा नारायण काळे (वय 70) या वृद्ध महिलेचे प्रेत सापडले आहे. जामखेड पोलिसांना मृत महिलेचा मूलगा माऊली नारायण काळे यांनी माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी आपल्या पो. कॉ. साने, पो. काँ. साखरे, पो. काँ. जाधव, पो. काँ. केकाण पो. काँ. सानप, पो. काँ. सकट या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली.सदर महिलेचे प्रेत कूजलेल्या अवस्थेत दिसत होते. त्यामुळे डॉक्टरांनी जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सदर महिला ही आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याचे समजते. जामखेड पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.