Breaking News

जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात


भेंडा तालुका नेवासा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये भगवान महावीर जयंती साजरी करताना जैन धर्माच्या माध्यमातून जगाला शांती व अहिंसेची शिकवण देणारे थोर व्यक्तीमत्व म्हणजे भगवान महावीर होय असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकर टेकणे होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शांती व अहिंसेबरोबर स्वछतेचा संदेश त्यांनी समाजाला दिला. जगामध्ये शांतता नांदावी म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले. यावेळी शिक्षकांच्या वतीने प्राचार्य दिनकर टेकणे, विशाल जैन तसेच विद्यार्थ्यांमध्ये विनय खाटिक, सानिका तुपे यांनी आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य दीपक राऊत यांनी तर, आभार प्रदर्शन सारिका कपोते यांनी मानले.