Breaking News

अळकुटीत श्रीराम जन्म यात्रोत्सव

पारनेर तालुक्यातील अळकुटी गावामध्येे श्रीराम जन्म उत्सवानिमीत्त रविवार दि. 25 व 26 रोजी मोठ्या जल्लोशात यात्रा उत्सव संपन्न होत आहे. यात्रेनिमीत्त श्रीराम मंदीर चौक परिसरामध्ये खेळणे, पाळणे तसेच विविध साहित्यांचे विक्रेते दाखल झाले आहे.

श्रीराम जन्म यात्रा उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असुन, रविवारी स. 7 वा. अभिषेक, 8 वा. मांडव डहाळे मिरवणुक, स. 10 वा. रामकथाकार ह.भ.प. अर्जुन महाराज शिंदे यांचे श्रीराम जन्म उत्सवाचे किर्तन होणार आहे. दुपारी सुदाम शिरोळे, शरद शिरोळे यांच्या तर्फे फलाहार व प्रसादाचा कार्यक्रम होऊन. सायंकाळी 7 वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.