Breaking News

पाचेगांव संस्थेला न्यायालयाचा दणका


कोेपरगांव, तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कुल जमिनीच्या वादासंदर्भात भारत सर्व सेवा संघ पाचेगांव या संस्थेला सर्वे नंबर १४१, ३२२-१ मधील जागेसंदर्भात स्थावर मालमत्तेची विक्री अगर हस्तांतर करू नये. अगर ति-हाईत इसमाचा अर्ज दाखल करू नये, असा निर्णय औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती सुनील पी. देशमुख यांनी दिला. या निर्णयामुळे या जागेच्या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली असून चांदेकसारे गांवक-यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
येथील भूमिपुत्र चांदेकसारे गांवचे विधीज्ञ विनायक होन यांनी औरंगाबाद खंडपिठात न्यू इंग्लिश स्कुलच्यावतीने बाजू मांडली. चांदेकसारे न्यू इंग्लिश स्कुल समितीचे अध्यक्ष संजय होन यांनी सुभाष होन, भाऊसाहेब होन, ज्ञानेश्वर होन, भिमाजी होन, नबाजी होन यांच्यावतीने औरंगाबाद खंडपिठात यावर अपिल {क्रमांक ११६८} दाखल केले होते. त्याबाबतचा युक्तीवाद औरंगाबाद खंडपिठात झाला. त्यात न्यायमूर्ती देशमुख यांनी वरील निर्णय दिला. दरम्यान, भारत सर्व सेवा संघ पाचेगांव या संस्थेने याआधीही औरंगाबाद खंडपिठात अपिल दाखल केले होते. मात्र त्यांनी ते स्वतःच काढून घेतले. महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट, पुणे यांच्याकडे ४१ ई संदर्भात चुकीची माहिती दिली. त्याबददलही न्यायालयाने पाचेगांवच्या या संस्थेच्या दोन व तीन सदस्यांना समज दिली.

या निर्णयाचे सर्वश्री केशव होन, किरण होन, कल्याण होन, उपसरपंच अशोक होन, अर्जुन होन, जयद्रथ होन, सत्तार शेख आदींसह चांदेकसारे येथील ग्रामस्थांनी फटाके फोडून स्वागत केले.