Breaking News

शिबलापूरच्या भैरवनाथ यात्रा उत्सवाला प्रारंभ



संगमनेर तालुक्यातील क्षेत्र शिबलापूरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रौत्सवाला उत्सवाला झाली आहे, माहिती यात्रौत्सव समितीच्यावतीने देण्यात आली. 

शिबलापूर गावच्या दक्षिणेस निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरावर भैरवनाथ महाराजाचे मंदिर आहे. जिल्ह्यासह नाशिक, पुणे, मुबंईसह आदी ठिकाणाहून भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. शिबलापूर ग्रामस्थांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला.गुरुवारी {दि. २९ } सकाळी भैरवनाथ तरुण मित्र मंडळाच्या सदस्यांनी पुणतांबे येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने भैरवनाथ मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यावेळी नाथाची काठी, पवित्र गंगाजल व महाराजाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सायंकाळी भैरवनाथ महाराज व जोगेशवरी देवी यांचा हळदी सोहळा, कलश व छबीना मिरवणूक, पारंपरिक वाद्य सनई-चौघडे यांच्या गजरात मुखवटे प्रदर्शन आदी कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

दरम्यान, उद्या {दि. ३० } सकाळी पेढा, नारळ व शेरणीचा नैवेद्य भैरवनाथाला चढवला जाणार आहे. तर सायंकाळी जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे उत्सवासाठी भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यात्रा कमिटी, देवस्थान मडंळ, भैरवनाथ तरुण मित्रमडंळ व शिबलापूर ग्रामस्थांनी केले आहे.