देशाच्या विकासात ओबीसींचे योगदान मोठे - प्रा. श्रावण देवरे
नाशिक - ओबीसींनी टिकवलेली संस्कृती आणि जमाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान देतो आहे. एकंदर समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट ठेवण्याचे काम ह्या समाजाने केले. मात्र, वारंवार मागणी करूनही गेल्या अठरा वर्षांपासून अद्यापपर्यंत ओबीसींची जनगणना करण्यात आली नसल्याची खंत ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसींसाठी योगदान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर उपस्थित होते.
प्रा. श्रावण देवरे पुढे बोलताना म्हणाले, देशातील विचारवंत आणि महापुरुष यांनी समाजाच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला गेला आहे. समाजातील जातीव्यवस्थेत ज्या घटकांचे शोषण झाले, त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आलीय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ओबीसींच्या विकासासाठी क ालेलकर आयोगाची स्थापनाही करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने तो स्वीकारला गेला नाही. पुढे मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु ओबीसी घटकास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. सन 2010 मध्ये ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात कायदा होवूनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओबीसीच्या आर्थिक सर्वेक्षणाला 2012 मध्ये सुरूवात करूनही आजपर्यंत ओबीसींची जनगणना झाली नसून ती तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. देवरे यांनी यावेळी स्पष्ट के ले.
कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, कुठल्याही रचनेत वा संस्थेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले तर समाजाची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधली जाईल. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. दयानंदन हत्तीअम्बिरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता सोनावणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर राहुल ढेरे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, प्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.