देशात राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात; 26841 कोटींची कामे सुरु
मुंबई / नवी दिल्ली - देशात 4 लाख 32 हजार 538 कोटींची राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असून यात सर्वात जास्त 26 हजार 841 कोटींची 107 कामे महाराष्ट्रात सुरु आहेत.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. देशातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे एकूण 1 हजार 470 प्रकल्पांचे कामे सुरु आहेत. या अंतर्गत एकूण 4 लाख 32 हजार 538 कोटी खर्चातून 44 हजार 108 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. यात सर्वात जास्त 107 प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यात 26 हजार 841 कोटी खर्चातून 3 हजार 320 कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु आहे.
महाराष्ट्राशिवाय कर्नाटकात 4 हजार 749 कोटींचे 83 प्रकल्प, उत्तराखंडमध्ये 4 हजार 827 कोटींचे 61 प्रकल्प, हिमाचल प्रदेश 1 हजार 36 कोटींचे 47 प्रकल्प, तामीळनाडूमध्ये 1 हजार 320 कोटींचे 46 प्रकल्प आणि बिहार मधील 5 हजार 106 कोटींचे 43 प्रकल्पांसह देशातील 30 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांचा यात समावेश आहे.