Breaking News

पळसंब येथे आंबा आणि माड बागायतीला आग

सिंधुदुर्गनगरी  - मालवण तालुक्यात पळसंब गावठण सडा इथल्या रंजन मालू यांच्या 20 एकर क्षेत्रावरील आंबा आणि माड बागायतीला अचानक लागलेल्या आगीत पूर्ण बागायत जळून गेली. आगीची तीव्रता एवढी होती की, त्यांच्या शेतमांगराजवळ असलेली मारुती वॅगनर गाडीसुद्धा त्यात पूर्णतः जळून त्यांचे गाडीसहित सुमारे 80 लाखांचे नुकसान झाले. 

पळसंब गावठण सडा इथ पुण्याच्या रंजन मालू यांनी 20 एकर क्षेत्रावर कलम आणि माड बागायत केली आहे. सध्या या बागेची देखभाल रुपेश सावंत आणि त्यांची पत्नी सारिका असे करतात. रुपेश सावंत हे पत्नी सारिकाला बर नसल्याने, कुडाळ इथे डॉक्टरकडे घेऊन गेले असता त्यांना दुपारी ते व्यवस्था बघत असलेल्या बागेच्या परिसरात आग लागल्याचे जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडीस यांनी फोन करून त्यांना सांगितला. यावर त्यांनी बागेच्या आजूबाजूस असणार्‍या सरमळकर यांना याची खबर देवून बघण्यास सांगितले. यात सरमळकर यांनी संपूर्ण बागेने पेट घेतला असून शेतमांगराजवळ असलेल्या वॅगनर (एमएच 05- ए-5 9083) गाडीनेही पेट घेतल्याचे सांगितले. यात मालू यांची 850 धरती आंबा कलमे आणि 150 माड जळून गेले.
गाडी जळाल्याची बातमी समजल्यावर या बागेची व्यवस्था बघणारे रुपेश सावंत यांची पत्नी सारिका हिला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून त्या आजारी पडल्या आहेत. या दुर्घटनेत सुमारे 850 आंबा कलमे आणि 150 माड जळून 80 सुमारे लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, ग्रामसेवक सूर्यवंशी, पोलीस पाटील दि लिप परब, कोतवाल विकास पोयरेकर यांनी आज घटनास्थळी जावून पंचनामा केला.