Breaking News

‘अभिरूची’तर्फे महिलांचा सन्मान


सात्रळ / प्रतिनिधी - जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून सोनगाव येथील अभिरूची फौडेंशन या सामाजिक संस्थेतर्फ धानोरे येथील दिघे वस्ती येथील प्राथमिक शाळेतील महिला शिक्षक, स्थानिक महिला आणि विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ यावेळी पार पडले. जयराम दिघे अध्यक्षस्थानी होते. अभिरूची सामाजिक फौडेंशनतर्फे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, याउद्देशाने शिवजयंती निमित्ताने हस्ताक्षर, रांगोळी, वकृत्व तसेच विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेष नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी महिला शिक्षक, स्कूल कमिटीतील महिला, विद्यार्थीनीचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी अभिरूची सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजु कानडे यांनी आज समाजात स्त्रीचे महत्त्व विद्यार्थी व उपस्थित पालकांना पटवून दिले. कार्यक्रमास शाखेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. डी. कलंगुडे ,श्रीमती आर. एस. मुंडलिक, श्रीमती डोमे, अर्चना दिघे, जयराम दिघे, गोरक्ष दिघे, विजु कानडे, रंगनाथ शिंदे, शहाजी दिघे आदींसह महिला, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.