Breaking News

बोर्ले येथे शिवजयंती उत्साहात साजरी मिरवणूक ; शिवव्याख्याते बाळासाहेब काकडे व्याख्यान


तालुक्यातील बोर्ले येथील काकडे वस्ती येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची गावातुन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर यावेळी आष्टी जि. बीडचे शिवव्याख्याते बाळासाहेब काकडे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले.


बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे यावेळी म्हणाले की, पहिल्यांदाच काकडे वस्ती येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. परंतू आगामी वर्षात तारखेप्रमाणेच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल, काकडे वस्ती वरील जि. प. शाळेचे शिक्षक विजय जेधे विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिकवण्याचे काम करतात. वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी वर्गणी करून तो रस्ता तयार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोर्ले गावात कोणताही कार्यक्रम घ्यावयाचा असेल तर आम्ही सर्व गट-तट बाजूला ठेवून सर्व एकत्र येवून कार्यक्रम पार पाडत असतो.
गाव श्रीमंत करावयाचे असेल तर प्रत्येक घरातील एकाला उच्च शिक्षित करा असे प्रतिपादन नवनिर्वाचित शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांनी जामखेड तालुक्यातील काकडे वस्ती (बोर्ले) येथील शिवजयंती उत्सवाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले. शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतून यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाण पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
यावेळी बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे, मुख्याध्यापक विजय जेधे, बोर्ले सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण, उपाध्यक्ष त्रिंबक पवार, संचालक परमेश्‍वर काकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी काकडे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष माजी सुंदरदास काकडे, शिवव्याख्याते प्रा. बाळासाहेब काकडे, मुख्याध्यापक शिवाजी काकडे, प्रा. गलांडे, अशोक पठाडे, जयहिंद काकडे, किरण पवार, जयसिंग पवार, शहाजी काकडे आदींसह नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारत काकडे होते. 
शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मुख्याध्यापक विजय जेधे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बोरला गावचे सरपंच भारत काकडे यांनी मानले.