Breaking News

स्व. भाऊसाहेब थोरात यांना १४ रोजी आदरांजली


संगमनेर प्रतिनिधी  - सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिशा देणार्‍या थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त येथील अमृत उद्योग समुहाच्यावतीने बुधवारी (दि. १४) आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर होत असलेल्या या कार्यक्रमास राज्यसभेचे माजी सदस्य, नामवंत लेखक, डॉ. भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर हे राहतील, अशी माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी दुर्गा तांबे, कांच थोरात, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, शरयु देशमुख, भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, लक्ष्मणराव कुटे, बाबा ओहळ, शिवाजीराव थोरात, शंकर खेमनर, अजय फटांगरे, निशा कोकणे, अमित पंडीत आदी उपस्थित राहणार आहेत.