Breaking News

खुरदैठण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ओंकार डूचे बिनविरोध


तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील राजकीय दृष्टीने आतिशय महत्वाचे गाव म्हणून ओळखले जाणर्‍या खुरदैठण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी युवा नेते ओंकार विठ्ठल डूचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

खुरदैठण ग्रामपंचायतीची निवडणूक ही 2015 साली जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खुरदैठण सेवा सोसायटीचे चेरमन महादेव डुचे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी सरपंच जया सातपुते यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी दरवर्षी नवीन सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचाची निवड दरवर्षी केली जात आहे. त्यामुळे युवा नेते ओंकार विठ्ठल डूचे यांची यावेळी उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच निवडीनंतर ते म्हणाले की, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आमचे मार्गदर्शक महादेव डूचे यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे त्या पदाचा सर्व सामान्य माणसाच्या प्रश्‍नानासाठी व गावाच्या विकासासाठी आणि गावातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहील असा विश्‍वास त्यांनी दिला आहे.

ग्रामपंचायत सदस्य असताना गाव हे हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आज रोजी संपूर्ण गाव हे हागणदारीमुक्त झाले. नवनिर्वाचित उपसरपंच सरपंच ओंकार डुचे यांचे अभिनंदन बाजार समितीचे संचालक महादेव डुचे, गणेश डुचे, सरपंच जया सातपुते, सुरेश डूचे, बाळासाहेब ठाकरे, संजय डूचे, विजय डूचे, भिमराव डुचे, अंकुश सांगळे, हभप अमृत डूचे महाराज, सुनिल सातपुते, सेवक डूचे, अविराज ठाकरे, परशुराम सांगळे, यांच्यासह सर्व खुरदैठणच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले.