Breaking News

पळशी हद्दीतील काळू धरणात युवकाचा मृतदेह नाजुक प्रकरणातुन खून झाल्याचा संशय


तालुक्यातील पळशी गावाच्या शिवाराजवळ असलेल्या माळवाडी येथील सुभाष बाळू दुधवडे (वय 29) या युवकाचा मृतदेह काळू धरणाच्या नंबर 4 च्या पाण्यात प्लॅस्टिक गोणीत आढणल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील पळशी शिवारातील माळवाडी येथील युवक सुभाष बाळू दुधवडे हा दि. 28 रोजी सायं. 4 वाजेपासुन बेपत्ता झाल्याची खबर पारनेर पोलीस स्टेशन येथे मयताचा भाऊ नामदेव दुधवडे यांनी दिली होती. त्यानुसार पोलीस तपास करत असताना दि. 10 मार्च रोजी गाजदिपुर येथील पोलीस पाटील भाऊसाहेब सातकर यांना काळू धरण परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमांनी या धरणाच्या पाण्यात प्लँस्टिकच्या गोणी तरंगत दिसल्याचे आणि यात काही तरी वेगळं दिसतय म्हणून या गुराख्यांनी व गाजदीपुरचे पोलीस पाटील यांनी पारनेर पोलीसांना माहिती दिली.

 त्यानुसार पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी गावकर्‍यांच्या मदतीने गोणी पाण्यातून बाहेर काढली असता, त्यामध्ये मानवी मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या पुतण्याने मृतदेह चुलत्याचा असल्याचे ओळखले. त्यानुसार मृत युवकाचे भाऊ नामदेव दुधवडे यांनी पोलीसांना सांगीतले की, माझ्या भावाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तिनेप. निरिक्षक संजय मातोंडकर, पो. सई पवार, पो. सई घुगे, स. फौ. भोसले, स. फौ. ढोले, स. फौ. रोकडे, पो. ना भिंगारदिवे, पो. के. महेश आव्हाड, पो. कॉ. शरद पवार पो. कॉ. साळवे, पो. कॉ. मोकाते यांनी वेगवेगळे तीन पथक करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी अशोक उर्फ बावड्या मोतीराम चिकणे (वय 30) रा. माळवाडी, पळशी आणि नाना मोहन बर्डे (वय 26) रा. जुना मळा पळशी यांच्या मुसक्या आवळण्यास यशस्वी ठरले. यातपासा कामी पोलीस अधिक्षक रंजन शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील, तपासी अंमलदार मनिष कलवानिया, पो. नि हनुमंत गाडे, पो. उप नि. संजय मातोंडकर यांनी तपासकामी मदत केली. या दोन्ही आरोपींना मा. न्यायालयाने दिनांक 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.