Breaking News

दिल्लीत जन आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून द्या अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र


दिल्लीमध्ये शेतकरी प्रश्‍नांतील लोकपाल, लोकायुक्त कायदा अंमल, निवडणूक सुधारणा या मागण्यांसाठी जन आंदोलन 23 मार्च रोजी होत आहे. आंदोलनासाठी दिल्लीमध्ये जागा उपलब्ध होण्यासाठी 7 नोव्हें. 2017 पासून आजपर्यंत 12 वेळा पत्रव्यवहार केले आहेत. दिल्ली पोलिस कमिशनर, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) च्या असिस्टंट डायरेक्टर (हॉर्टीकल्चर) या संबंधितांना वेळोवेळी पत्र पाठविली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दप्तरात प्रत्यक्ष भेट आणि चर्चा देखील केली आहे.

 परंतू आत्तापर्यंत कुठेही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. अण्णा पत्रात म्हणतात की, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, लोकपाल लोकायुक्त आणि अनेक लोकांच्या हिताचे मुद्दे मी आतापर्यंत 43 वेळा पत्र लिहीले आहेत. परंतू अजून काही उत्तर मिळाले नाही. ते लोकपाल लोकायुक्त बद्दल आणि शेतकर्‍यांविषयी काहीही झाले नाही. म्हणूनच आता मी माझ्या संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्ताविक शासनाने संविधानानुसार शांतिपूर्ण आणि अहिंसात्मक मार्गाने होणार्‍या आंदोलनास जागा उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे.

मात्र परवानगी अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे आता नाविलाजाने जेलमध्ये आंदोलन करावे लागणार असे वाटत असेल तर लोकतंत्रासाठी हे योग्य नाही. मी 30 वर्षे जनतेच्या हितासाठी राज्य आणि देशासाठी आंदोलन करत आलो आहे. परंतू आजपर्यंत कधीही हिंसक मार्गाने आंदोलन केले नाही. माझ्या जीवनात महात्मा गांधींच्या विचारांचा आदर्श आहे. त्या आदर्शला तडा जाऊ न देण्याची सरकारची जबाबदारी आहे. देशभरातून सर्व प्रांतातून जनता या आंदोलनाची दिल्ली येथे येणार आहे. अशा स्थितीत आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून न देण्याची सरकारची भूमिका योग्य नाही, असेही अण्णा हजारे यांनी पत्रकात म्हटलं आहे.