Breaking News

कृषीपंपांची वीजबिल वसुलीला स्थगिती

फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. कृषीपंपांच्या वीजबिल वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरणच्यावतीने राज्यातील वीजबिले थकवलेल्या शेतकर्‍यांची वीजतोडणी करण्यास सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केले. त्यानंतर सभागृहात अजित पवारांनी यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी वीज बिल वसुलीला स्थगिती दिल्याची घोषणा केली.