कोडोली येथील खासगी सावकारावर गुन्हा दाखल
सातारा : व्याजाने दिलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी घरात घुसून साहित्याची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी देणार्या कोडाली (ता. सातारा) येथील रणजीत खवळे याच्याविरोधात खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोडोली येथे कृष्णात आत्माराम जाधव हे राहण्यास असून ते हमाली काम करतात. जानेवारी 2016 मध्ये जाधव यांनी कोडोली येथे राहणार्या रणजीत खवळे याच्याकडून 20 हजार रुपये दरमहिना 20 टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाने घेतलेल्या रक्कमेपोटी जाधव यांनी 70 हजार 500 रुपये खवळे याला परत केले होते. एवढी रक्कम परत करुनही खवळे हा मुद्दल बाकी असल्याचे सांगत जाधव यांना धमकावत होता.
दि. 20 रोजी रात्री आठच्या सुमारास खवळे हा जाधव यांच्या घरी आला. खवळे याने घरात घुसून होमथिएटरची तोडफोड केली. तोडफोड करताना खवळे याने मुद्दल न दिल्यास घरातील वस्तू नेईन, असे म्हणत साहित्य उचलण्यास सुरुवात केली. यास जाधव यांनी विरोध दर्शविला. यामुळे चिडलेल्या खवळे याने जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मध्ये आलेल्या जाधव यांच्या पत्नीलाही खवळे याने मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर मुद्दल न फेडल्यास जीवे मारण्याची धमकी देत खवळे हा त्याठिकाणाहून निघून गेला. या घटनेची तक्रार नंतर जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार खवळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार जाधव अधिक करत आहेत.