Breaking News

अहमदनगर येथील परीक्षा केंद्रावर दगडफेक

पारनेर : जिल्ह्यातील पारनेरच्या तालुक्याच्या टाकळी ढोकेश्‍वर येथील जिल्हा मराठा संस्थेच्या ढोकेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली. दहावीचा पेपर सुरु होण्याअगोदर एका टोळक्याने शिक्षकांच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी केंद्रचालक श्रीधर बाबासाहेब झावरे यांनी टाकळी ढोकेश्‍वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली. याच विद्यालयातील सेमिनार हॉलच्या दरवाजाची तोडफोड करण्यात आली. तसेच इमारतीच्या काचाही दगडाने फोडण्यात आल्या.