Breaking News

वाराणसीत सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक हे देखील विमानतळावर उपस्थित होते.

यानंतर पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी मिर्झापूर येथे जाऊन सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी वाराणसीचा गंगा घाट फुलांनी सुशोभित करण्यात आला आहे. तसेच गंगा घाटातील नौका सामान्य पर्यटकांसाठी काही काळ पुर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. दोन्ही नेते दिवसभरात वाराणसीतील अनेक क ार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. या भेटीनिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निमलष्करी दल, ब्लॅक कॅट कमांडो आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)या तीन सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले असल्याची माहिती वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी दिली. वाराणसीत दोन्ही नेते दीनदयाल हस्तकला संकुल येथे कारा गिरांशी संवाद साधून त्यांच्या कलेचे थेट प्रात्यक्षिक बघतील. त्यानंतर ते अस्सी घाट येथून नौकाविहार करत ऐतिहासिक दशाश्‍वमेध घाटाला भेट देतील. यावेळी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येणार आहे.