Breaking News

गाणे न वाजविल्याने मारहाण


आश्वी : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे चाँदशहावली बाबा मिरवणुकीत गाणे न वाजविल्याचा राग धरत आश्वी खुर्द येथील आकाश बर्डे, दत्तू बर्डे आणि अनिल गायकवाड यांना बेदम मारहाण केली. शिबलापूर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी बाळू मुंतोडे याला आश्वी पोलिसानी ताब्यात घेतले.

शिबलापूर येथे चाँदशहावली बाबाचा यात्रा उत्सव असल्याने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आश्वी - शिबलापूर रस्त्यावर मिरवणूक सुरु होती. त्यावेळी आरोपी बाळू मुंतोडे याने एक गाणे वाजण्याची आकाश बर्डे यांच्याकडे मागणी केली. बर्डे याने ‘थोडावेळ थांबा’ असे म्हटल्याने मुंतोडे याला राग अनावर झाला. त्याने आकाशला गँरेजजवळ बोलावून घेत लाकडी दांड्याने मारहान करण्यास सुरवात केली. यावेळी आरडा-ओरडा ऐकून दत्तू बर्डे, सदाशिव बर्डे व अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी येत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. आरोपी योगेश मुंतोडे याने शिवीगाळ करत दत्तू बर्डे याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. दिपक मुंतोडे याने लोखंडी रॉडने अनिल गायकवाड यांच्या हातावर व पाठीवर जबर मारहाण केल्याचे आकाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.