Breaking News

शक्तिशाली स्फोटात ५ ठार; १५ जखमी.


एका घरात शक्तिशाली स्फोट झाल्याने ३ चिमुकल्यांसह ५ ठार, तर १५ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री बिहारच्या नालंदा जिल्ह्यात घडली. सोहसराय गावात अवैधरीत्या फटाक्यांचा व्यवसाय करणाऱ्या सरफराजच्या घरात हा स्फोट झाला. या शक्तिशाली स्फोटात सरफराजच्या २ मुली, एका मुलगा, बहीण शाइस्ता व आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिन्याचा चिमुरडा आणि चार वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. स्फोटातील जखमींना उपचारासाठी पाटणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. .