Breaking News

एन. टी. एस. परीक्षेत ‘आत्मा मालिक’चे विदयार्थी चमकले

कोपरगाव ता. प्रतिनिधी  - एन. सी. ई. आर. टी. नवीदिल्ली व महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे आयोजित राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा राज्यस्तर निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी राज्यातून ६९ हजार ०२० विदयार्थी नोंदविण्यात आले. त्यातील ३८७ विदयार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी पात्र झाले. अहमदनगर जिल्हयातून १६ विदयार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलाच्या ओम गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या विद्यालयाच्या ७ विदयार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

ओम गुरूदेव माध्यमिक गुरूकूलामध्ये दैनंदिन अध्यापनाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षांची विशेष तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे व त्यामध्ये यश मिळविणे यासाठी गुरूकूलात तज्ज्ञ शिक्षकांकडून विशेष तयारी वर्ग चालविले जातात. याचीच फलश्रूती म्हणजे या विद्यार्थ्यांनी एन. टी. एस. परीक्षेत मिळविलेले यश होय. अशी प्रतिक्रिया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ललित पाटील, गणपत तोरमल, महेश पाटील, गजानन नवले, नितीन जोपळे, अक्षय गायकवाड, मनोज पवार यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, विषय शिक्षक सचिन डांगे, गणेश रासने, नयना शेटे, अनिता कोल्हे, राजेंद्र जाधव, कल्याणी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, प्राचार्य, कांतीलाल पटेल, माणिक जाधव, विभाग प्रमुख नितीन सोनवणे आदींनी या विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.