Breaking News

पाच जिल्ह्यांत धुमाकुळ घालणारा दरोडेखोर अटकेत

बीड, दि. 12, मार्च - पाच जिल्ह्यांमध्ये धुमाकुळ घालणारा अट्टल दरोडेखोराला आष्टी पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि बीड या पाच जिल्ह्यातील पोलिसांना तो गुंगारा देत होत्या. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. आटल्या ईश्‍वर भोसले असे दरोडेखोराचे नाव आहे. 


अनेक साथीदारासह टोळी तयार करून दरोडे, चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला करून लुट करणार्‍या दरोडेखोर टोळीचा तो म्होरक्या आहे. अटल्या भोसले याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. यापूर्वी त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करुन तो पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी यावेळी सर्व तयारीनिशी व मोठ्या शिताफीने सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या.