अतिरिक्त डोसामुळे सुनंदा पुष्करचा मृत्यू - शशी थरुर
नवी दिल्ली, 14 - औषध अतिरिक्त प्रमाणात घेतल्याने सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्याचा दावा सुनंदा याचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केला.
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीने शशी थरुर यांची तब्बल पाच तास चौकशी केली. दरम्यान, मृत्यूच्या आदल्या दिवशीच सुनंदा यांचे शशी थरुर यांच्याशी भांडण झाले होते. त्याबाबतही एसआयटीने थरुर यांच्याकडे विचारणा केली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पोलीस या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. 17 जानेवारी 2014 ला सुनंदा यांचा मृतदेह दिल्लीतल्या पंचतारांकीत हॉटेलमधल्या खोलीत आढळून आला होता.