बंद घराचे कुलूप तोडून रोकड लंपास
तालुक्यातील कासारा-दुमाला गावात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २१ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात.
मंगळवारी {दि. १३} रात्री दहा ते बुधवारी पहाटे साडे पाचच्यादरम्यान ही घटना घडली. सुरेखा सिताराम गुंजाळ यांच्या कासारा-दुमाला येथील घरातून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. या घटनेचा पुढील तपास हेड कॉ. आर. ए. पठाण करीत आहेत.