Breaking News

अचानक वीजप्रवाह वाढल्याने उपकरणे जळाली


तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या समस्या भेडसावत आहेत. दरम्यान, वळण येथे काही भागात मंगळवारी {दि. १३} रात्री अचानक जास्त दाबाने वीजपुरवठा सुरू झाला. यामुळे अनेकांची वीजेवर चालणारी उपकने जळून खाक झाली. या घटनेत अनेक वीजग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

गेल्या काही दिवसांपासून सात्याने या परिसरात विजेचा लंपडाव सुरू आहे. सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे.

मंगळवारी {दि. १३} रात्री अचानक विजेच्या जास्त दाबाच्या प्रवाहाने अनेक ठिकाणचे बल्ब, फॅन, टि. व्हि., मोटर, कुलर, मोबाईल चार्जसह अनेक उपकरणे जळाली. तांत्रिक अडचणींच्या काळात विजेचा प्रवाह बंद करण्याची आवश्यकता आहे. मात्र रात्रभर सुरु प्रवाह होता. त्यामुळे अनेकांची उपकरणे जळाली. या घटनेमुळे महावितरणविरूद्ध ग्राहकांमधे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.