Breaking News

नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांत खडाजंगी


तालूक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदमध्ये नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे पालिका प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली.

नगर परिषदेत आज {दि. १४ } दुपारी एक वाजेदरम्यान सभागृहात बैठक सुरु होती. यावेळी भाजपचे नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी अविनाश गांगूर्डे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नगराध्यक्ष कदम यांनी मुख्याधिकारी गांगोडे यांना शिवीगाळ करत मारण्यास खुर्ची उचलल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र यावेळी नगरसेवक संजय बर्डे, आदिनाथ कराळे, सचिन ढूस, प्रकाश संसारे, अण्णा चोथे व कर्मचार्यांनी मध्यस्थी केल्याने भांडणे सोडविण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, मागासवर्गीय कर्मचारी सहाव्या वेतन फरकाबाबत चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष कदम यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. चर्चा करत असतांना मला अश्चिल भाषेत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले, कोणत्याही प्रकारची अश्चिल भाषा वापरली नाही. मुख्याधिकारी हे खोटे आरोप करीत आहेत. दरम्यान, मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी यांना भेटून फिर्याद देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा विरोधी नगरसेवकांनी जाहिर निषेध केला. अशा घटना पालिकेत वारंवार होत असून नगराध्यक्ष कदम मनमानी कारभार करत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.