Breaking News

टिळकनगरमध्ये आरोग्यदानाची प्रार्थना सभेचे आयोजन

श्रीरामपूर / प्रतिनिधी /- तालुक्यातील टिळकनगर येथे रविवार, ११ मार्च,सोमवारी मंगळवारी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आरोग्यदानाची प्रार्थना सभेचे आयोजन टिळकनगर धर्मग्रामाच्या वतीने टिळकनगर येथील चर्च समोरील परिसरामध्ये आयोजित केलेले आहे. 

या प्रार्थना सभेचे प्रमुख प्रवचनकार फा. ऑलवींन मिस्किटा आणि त्यांचे सहकारी असणार आहे. या प्रार्थनासभेचा विशेष हेतू पवित्र जपमाळ (रोजरी), स्तुती आराधना, आरोग्यासाठी प्रार्थना असेल. प्रार्थना सभेसाठी येतांना भाविकांनी बायबल, वही, पेन आपल्या बरोबर घेऊन यावे. तसेच या प्रार्थना सभेसाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पँरिष कौन्सिल मेंबर संजय कोळगे यांनी केले आहे. या प्रार्थना सभेच्या अधिक माहितीसाठी रेव्ह. फा. मायकल वाघमारे ( प्रमुख धर्मगुरू टिळकनगर) रेव्ह. फा. फ्रान्सिस ओहोळ ( सहाय्यक धर्मगुरू टिळकनगर) डिकन आनंद बोधक , यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.