Breaking News

विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्मृतीदिन साजरा


सात्रळ/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील सात्रळ, माळेवाडी, डुक्रॆवाडी, येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन सोनगाव सात्रळ येथील विद्यानिकेतन इंग्लीश मिड़ीयम स्कुल मध्ये मनवण्यात आला. 

सावित्रीबाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे सस्थांपक चेअरमन मा. मिलींद भाऊ अनाप, तसेच सोनगावचे उपसरंपच मा.किरण अंत्रे, संदिप सजन, प्रविण अनाप, ग्रामपचायंत सदस्य संदीप अनाप, तसेच गणेश अनाप गोकुळ शिदे तसेच सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना मिलींद अनाप म्हणाले की , आज सावित्रीबाई फुलेमुळे महिला शिक्षित झाल्या. तसेच राष्ट्रपती पदापर्यत पोहचु शकल्या. महिलाना समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्यात फुले दाम्पत्याचा मोलाचा वाटा आहे.

याच बरोबर अनाप यांनी परिसरातील नागरीकांना स्कुलमध्ये आपल्या विना डोनेशन कुठलेही छुपेखर्च न घेता. मुलाचे अॅडमिशन विद्यानिकेतन स्कूलमध्ये घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार भिकाजी अनाप यांनी मानले. तर सूत्र संचालन संदीप सजन यांनी केले.