मोकाट कुत्र्यांचा दहशतीने नागरिक धास्तावले ; तात्काळ बंदोबस्ताची मागणी
टिळकनगर हया गावांतील रस्त्याचा समोरील भाग हा दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीत तर रस्त्याचा पाठीमागचा भाग रांजणखोल ग्रामपंचायत हद्दीत येतो. हया दोन्ही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष घालून या मोकाट असलेल्या कुत्र्यांना ताबडतोब बंदोबस्त करून जेरबंद करण्यात यावे. अशी जोरदार मागणी नागरीकांनी केली आहे. तसेच टिळकनगर इंडस्ट्रीजच्या आश्रमात अनेक पाळीव प्राणी, जनावरे असून यांमध्ये शेकडो कुत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. हे कुत्रे जरी कारखान्याच्या आवारात बंदिस्त असले, तरी बंदिस्त भागातून पलायन करून गावात प्रवेश करीत आहे. यामुळे गावांतील कुत्र्यांच्या संख्येत आणखीच वाढ झालेली आहे
. तसेच गावांतील काहींच्या मते मधल्या काळात शिर्डी येथील असलेल्या मोकाट कुत्रे याच भागांत आणून सोडत असल्याचे सुध्दा सांगत आहे. तसेच परिसरातील चौका चौकांमध्ये मटणाची दुकाने थाटल्याने या भटक्या मोकाट कुत्र्यांना आयतीच मेजवानी मिळाली आहे. दुकानाच्या लगतच टाकाऊ मांस टाकली जात असल्याने तसेच विक्रेत्यांवर कोणतेच निर्बंध नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या उच्छाद व संख्या देखील वाढली आहे. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून याचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत शेकडो जणांना कुत्रे चावले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी परिसरातील 8 वर्ष वयाच्या लहान बालिकेस आपल्या आत्याच्या घरी खेळत असतांना कुत्र्याने पाठीमागून येऊन अचानकपणे डोक्यावर जोरदार हल्ला चढविला होता. आणि तिचा चावा घेतल्याने ह्या मुलीचे डोक्यावरची चमडी ओरबडून बाहेर पडली होती. तसेच कुत्र्याचे दात सुध्दा गळून तिच्या डोक्यात घुसले होती. सदर मुलगी रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाली. ती गंभीर अवस्थेत होती. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
टिळकनगर दत्तनगर रोडवर कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. या मोकाट कुत्र्यांचा संबंधितांनी तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा संबंधीत प्रशासना विरोधात आंदोलन छेडले जाईल. असा इशारा अब्दुल सलाम पांडे, कलिम पठाण, सिध्दार्थ बागुल, संदीप औटी, योगेश त्रिभुवन, मुकेश जाधव,अनिल माघाडे, बबलू त्रिभुवन, जाँन सोनवणे, मिरण पठाण, सचिन विधाटे, आदींनी दिला आहे.
