Breaking News

यशवंतराव चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने
अहमदनगर जिल्हा बँक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, मा.महापौर दिपक सुळ, तालुका आध्यक्ष गहीनीनाथ दरेकर, संजय सपकाळ, गजानंद भांडवळकर, साहेबान जाहागीरदार, वैभव ढाकणे, अमित खामकर, प्रा.बबनराव गाडेकर, सिध्दार्थ आढाव, भरत गारुडकर, बाबा गाडळकर, प्रकाश भागानगरे, स्वप्निल ढवण, अजय दिघे, महेश बुचडे, अक्षय घोरपडे, अंन्सार सय्यद, लहु कराळे, प्रसंन्न बिडकर, मारुती पवार, लकी खुबचंदानी, छबु काडेकर, मयुर भापकर, अजीम राजे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.माणिक विधाते म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्यांच्या सर्वांगीन विकासासाठी यशवंतराव चव्हाण यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्यांच्या वैचारिक वारसा आजही प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. त्यांचा वैचारिक वारसा राष्ट्रवादीच्या माध्यमातून चालविला जात आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देवून, वंचित घटकाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.