Breaking News

निमगाव वाघा येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन


नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले असून, त्याचे प्रारंभ रविवार दि.18 मार्च रोजी होणार आहे. दि.18 ते 26 मार्च या नऊ दिवस चालणार्‍या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ व अ.भा.वारकरी मंडळाने केले आहे.
 
वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबाबा देशमुख (आळंदी) व ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) यांच्या आशिर्वादाने हा सोहळा रंगणार आहे. नऊ दिवस चालणार्‍या या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. सुभाष महाराज सुर्यवंशी (केडगाव), ह.भ.प. दामोधर महाराज धोर्डे (कल्याण), ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा), ह.भ.प. तुलशीदास महाराज लबडे (नगर), ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दळवी (श्रीगोंदा), ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे (देव दैठण), ह.भ.प. सिध्देश्‍वर महाराज राऊत (सुपा), ह.भ.प. अनिल महाराज वाळके (पाथर्डी) यांचे किर्तन होणार आहे.

 रविवार दि.25 मार्च रोजी ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) हे राम जन्माचे किर्तन करणार आहेत. तर सोमवार दि.26 मार्च रोजी समारोप प्रसंगी सकाळी 10 वा. ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांचे काल्याचे किर्तन होवून, महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाला ह.भ.प. विकास महाराज मिसाळ (चास) हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे हे तीसावे वर्ष आहे. कार्यक्रमाचे हे तीसावे वर्ष आहे. दररोज पहाटे काकडा भजन व सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण तर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ होणार आहे. रात्री 9 ते 11 वा. किर्तनाचा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा अ.भा.वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे यांनी दिली