Breaking News

लाळखुरकूत लसीकरण मोहिमेस प्रारंभ पशुसंवर्धन विभागाकडून लाभ घेण्याचे आवाहन


पशुवैद्यकीय दवाखाना माही जळगाव (ता.कर्जत) द्वारा लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे."स्वस्थ पशु-खुशहाल किसान, उत्पादक पशु-संपन्न किसान" हे ब्रीद घेऊन हा लसीकरण कार्यक्रम जिल्हा व तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जि. प.सदस्य, पं. स.सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी व खासगी पशूसेवक यांच्या सहकार्याने राबवला जात आहे.अशी माहिती माही जळगाव येथील सहा. पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे यांनी दिली.

माही,जळगाव,निंबोडी, टाकली खंडेश्वरी,झिंजेवाडी,नवसरवाडी, शितपूर, चिंचोली,खंडाळा,गोईकरवाडा, वाघनळी, नागापूर, तरडगाव, पाटेगाव आदी गावांतील पशुपालक शेतकरी बांधवांनी आपली गाय, बैल,म्हैस,, वासरे यांना लालखुरकुत रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.के.के.चौरे व सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे यांनी केले आहे.