Breaking News

मोदी सरकारचा दररोज एक घोटाळा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांचा आरोप

नवी दिल्ली : मोदी सरकार म्हणजे प्रत्येक दिवशी एक घोटाळा, असा आरोप काँग्रेसने केला. देशात विविध बँकांमधील घोटाळे उघड झाले आहेत. नुकताच आयसीआयसीआय आ णि आयडीबीआय बँकांमध्येही घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या सर्व घोटाळ्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मौन तोडावे, अशी मागणी का ँग्रेस पक्षाने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी असा आरोप केला आहे, ‘मोदी सरकारच्या देखरेखीत नियमितपणे बँक घोटाळे झाले. गेल्या साडेतीन महिन्यांत बँक घोटाळ्यांमुळे जवळपास 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे’. गेल्या 24 तासात, आयडीबीआय बँकेत 772 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. नि रिक्षणाचा आभाव, व्याजांचा वाद, असभ्य वर्तन, वैयक्तिक फायदे दडवून ठेवणे, तसेच बँकेच्या नियम व अटींची अंमलबजावणी आणि रक्षण करण्यात आलेले अपयश हे आयसीआयसीआय बँकेत झालेल्या 2849 कोटी रुपयांच्या घोटाळाला कारणीभूत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापनावर संशयाचे बोट ठेवले जात आहे. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचे ’मौन व्रत’ सोडावे आणि या घोटाळ्यात सामिल असलेल्यांवर ते काय कारवाई करणार हे सांगावे, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.