Breaking News

शहरात वेगाची मर्यादा अनियंत्रीत


शहरातील अंतर्गत भागातील मार्गांवरून जात असताना अनेक वाहनांना वेगाची मर्यादा ठरवून दिलेली असते, मात्र दिवसेंदिवस ही वेेगमर्यादा प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी गाड्या, बसेस त्याचबरोबर मालवाहतूक कंटेनर यांचेकडून वेगाची मर्यादा ओलांडताना दिसून येत आहेत. मात्र तरिही वेगाची मर्यादा ओलांडणार्‍या चालकांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारला जात नसल्याने, त्यांचे मनोबल वाढत असून, शहर वाहतूक शाखेचे यावर वचक नसल्याचे दिसू लागले आहे.