शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरी
शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये रोडरोमियोंचा वावरदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. शाळा महाविद्यालयांच्या अवतीभवती टवाळखोरांची संख्या वाढत आहे.
त्याचबरोबर टवाळखोरी वाढत असल्यामुळे महाविद्यालयीन आवारांमध्ये हाणामारी, भांडण, मुलींना नाहक त्रास देण्याचे प्रकार देखील पहावयास मिळत आहेत. मात्र यासर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन सुरक्षा यंत्रणा कामास लावली जात आहे.