Breaking News

राळेगळ ग्रामस्थांसह सर्व पक्षीयांचा रास्ता रोको


लोकपाल, लोकायुक्त व शेतकर्‍यांचे प्रश्‍न यासाठी दिल्ली येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या आंदोलनास राळेगण सिध्दी परिवार व सर्व पक्षीयांनी पाठींबा दर्शवत नगर-पुणे हायवेवर रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपाल, लोकायुक्त व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी दिल्ली येथे रामलीला मैदानावर उपोषणास बसले आहेत. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी राळेगण परिवार व सर्व पक्षीयांनी नगर-पुणे हायवेवर सुमारे वीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात पानोली, वाडेगव्हाण, राळेगण, पिपळनेर, वडुले, परिसरातील महिला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात माजी सरपंच जयसिग मापारी, राळेगणचे सरपंच लाभेश औटी, ज्येष्ठ नेते सबाजी गायकवाड़, अशोक सावंत, राहुल शिंदे, सोन्याबापू भापकर, संजय वाघमारे, शंकर नगरे, गणेश शेळके आदींसह परिसरातील तरुण, तरुणी विद्यार्थी ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी आंदोलन कर्त्यांनी गुलाबाची फुले व मागण्यांची पत्रक वाटून शांततेत आंदोलन केले. पारनेरचे नायब तहसीलदार संजय माळी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.