मुंबई : राज्यात सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी याचा तपास हा दक्षता पथकामार्फत करण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. गुटखा विक्री करणार्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जावा यासाठी कायदा करू तसेच दक्षता पथकाच्या चौकशीने मुंडे यांचे समाधान झाले नाही तर सीआयडीमार्फत या प्रकरणाची चौकशी करू असेही आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले. गुटखा बंदी असताना राज्यात गुटखा विक्री होतेच कशी असा सवाल मुंडे यांनी केला. परीमंडळ 5 (भिवंडी) मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्री सर्वात जास्त प्रमाणात होत आहे, याची चौकशी सीआयडी मार्फत करावी विभागातील अधिकार्यांची चौकशी करून दोषी अधिकार्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.राज्यात अनेक ठिकाणी सापडलेल्या गुटखा आणि तत्सम उत्पादनावरून गुटखा विक्री कशी सुरु आहे याचे दाखले मुंडे यांनी यावेळी दिले.राज्यात महसुली उत्पन्नाचा विचार न करता आणि जनतेच्या आरोग्याचा कोणताही विचार न करता उघडपणे राज्यात बंदी घातलेली असताना गुटखा,पानमसाला याबरोबरच सुगंधित सुपारी, तसेच तंबाखू व खरा विकले जाते असल्याचा मुद्दा मुंडे यांनी उपस्थित करत याविषयी प्रभावी अशी कार्यवाही होत नाही असे सांगत यामुळे होणार्या दुष्परिणामाची माहिती देत यावर तात्काळ कारवाई करून याची सीआरडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी गुटखा विक्री विरोधात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा क रणार असे सांगितले. गुटखा विक्रीस प्रोत्साहन देणार्या अधिकार्यांची दक्षता पथकामार्फत चौकशी करू व प्रसंगी सीआयडी मार्फत चौकशी करू असे आश्वासन हि त्यांनी दिले.
गुटखा विक्री ठरणार अजामीनपात्र गुन्हा कायदा करण्याचे ना. गिरीश बापट यांचे आश्वासन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
23:00
Rating: 5