Breaking News

कर्जतमध्ये अस्मिता कार्यशाळेचे उद्घाटन मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम


जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधत कर्जत येथे पंचायत समितीच्या वतीने अस्मिता कार्यशाळेचे आयोजन करत मासिक पाळी व्यवस्थापण व हातधुण्याचे प्रात्यक्षिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका व आशा कर्मचार्‍यांना दाखविण्यात आले. कर्जत येथील शिवपार्वती मंगलकार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा शेळके या होत्या. यावेळी प्रास्ताविक एकात्मिक बाल प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शोभा तापकीर यांनी प्रास्ताविक करताना या कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट करून सांगितली. त्या म्हणाल्या की, महिलाच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या विषयात सर्वांनी अत्यंत जबाबदारीने काम कराण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले. यावेळी नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांतगितले की, महिलांसाठी मासिक पाळी हे मिळालेले वरदान आहे. या काळात महिलांनी आपल्या कामातून सुटका करून विश्रांती घ्यावी, मात्र त्याचा चुकीचा अर्थ लाऊन, या चार दिवसांत शिवताशिवत न करण्याची पद्धती रूढ झाली आहे. ती बदलण्याची गरज व्यक्त करताना या प्रश्‍नावर महिला, युवती मनमोकळे पणाने बोलत नाहीत. हा प्रश्‍न घेऊन डॉक्टराकडे जात नाहीत. हे बदलण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी सांगितले की, मासिक पाळीबाबत शहरीभागात जनजागृती होत आहे. शहरातील महिला पॅॅड वापरू लागल्या आहेत. मात्र अजूनही ग्रामीण भागातील मुली व महिलांमध्ये हवी तशी माहिती झाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये खर्‍या अर्थाने प्रबोधन करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याकडे असल्याचे सांगून, मी जिल्हा परिषद अध्यक्षा होते, त्या काळात सर्वात जास्त मला तुमचे काम आवडत होते असे म्हणत उपस्थित कर्मचार्‍यांच्या टाळ्या मिळविल्या. तसेच त्यांना हे काम करण्यासाठी प्रोत्साहित केलेे. सॅॅनेटरी नॅॅपकिनबद्दल जनजागृती करणारा पॅडमॅन हा चित्रपट ग्रामीण भागात विविध ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन गुंड यांनी यावेळी केले. यावेळी
पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धीवंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, कृषी अधिकारी रूपचंद जगताप, मुकुंद पाटील, आरोग्य अधिकारी संदीप पुंड, विस्तार अधिकारी अटकोरे, भोंग, अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका संगीता ढवळे, शकुंतला लाढाने, एल. एन. बेलेकर, यशपाल राऊत आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुद्रिक यानी केले. यावेळी आशाच्या तालुका गट प्रवर्तक काते यांनी महिलांना मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधत कर्जत येथे पंचायत समितीच्या वतीने अस्मिता कार्यशाळेचे आयोजन करत मासिकपाळी व्यवस्थापण व हातधुण्याचे प्रात्यक्षिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका व आशा कर्मचार्‍यांना दाखविण्यात आले. तर लघु चित्रपटाद्वारे उपस्थित महिला कर्मचार्‍यांची जागृती करत प्रशिक्षित करण्यात आले. या कर्मचार्‍यांनी गावागावात महिला व युवतींमध्ये जागृती करावी अशी अपेक्षा आहे.